नमस्कार मंडळी!

गेल्या वर्षात सर्व कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद देऊन ते कार्यक्रम यशस्वी करण्यात आपण सर्वांनी हातभार लावला. नवीन कार्यकारिणी समितीही ह्या वर्षी मनोरंजनाचे कार्यक्रम असेच यशस्वीरित्या आयोजित करण्याचा पुरेपुर प्रयत्न करेल. मंडळाच्या सर्वसाधारण सभेत नव्या (सा-२०१४) कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाधिकारी, सचिव, व्हेबमास्टर आणि ३ कार्यकारी सदस्य यांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या. नवीन पिढीचे विचार आणि माजी सदस्यांच्या मार्गदर्शनातून ही नवीन समिती नक्कीच यशस्वी ठरेल, अशी खात्री आहे.

 

तिळगूळ घ्या गोड गोड बोला...
 

मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. याचवेळी ऊसाचे नवीन पीक, त्यातून काढलेला रस, रसातून केलेला गूळ आणि गुळाचे मस्त मस्त खाद्य पदार्थ; गुळाची पोळी, तिळगुळाचे लाडू यांची चंगळ! तीळ आणि काळा रंग हे शुभ नसूनही संक्रांतीच्या दिवशी मात्र तिळाचेच पदार्थ खाल्ले आणि काळेच वेश घातले जातात.


संक्रांत म्हणजेच आकाश भरून निरनिराळे, लहान-मोठे, रंगीबेरंगी पतंग आणि चक्र्यांवरती फिरते लाल-पिवळे मांजे.


डेलावेअर व्हॅली मराठी मित्र मंडळ आपल्या सर्वांना सहकुटुंब ह्या समारंभासाठी सादर आमंत्रित करीत आहे. कृपया स्थळ, तारीख आणि वेळ यांची नोंद करून घ्यावी:


      कार्यक्रमाचे स्थळ: डेलावेअर हिंदु टेम्पल, वेडिंग हॉल. नकाशा (map) .
      तारीख आणि वेळ: १८ जानेवारी २०१4 दुपारी ११:०० ते ३:३०

११:०० - १:०० स्वागत, पुढील वर्षासाठी सभासद नोंदणी, हळदी-कुंकू आणि स्वादिष्ट भोजन
१:०० - ३:३० ओळख, बोर नहाण व विविध धमाल कार्यक्रम
 
      कार्यक्रमाचा दर:

Members with RSVP (12 years and above)  $ 13.00
Students with RSVP (Please bring your student ID)  $ 10.00
Children with RSVP (5 - 11 years)  $ 8.00
Members without RSVP (12 years and above)  $ 17.00
Non Members with RSVP (12 years and above)  $ 17.00
Non Members without RSVP (12 years and above)  $ 20.00
Children (under 5 years)  Free


तयारी साठी आपली नोंदणी (RSVP) दि. १३ जानेवारी २०१४ पर्यंत करावी, ही नम्र विनंती.