मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. याचवेळी ऊसाचे नवीन पीक, त्यातून काढलेला रस, रसातून केलेला गूळ आणि गुळाचे मस्त मस्त खाद्य पदार्थ; गुळाची पोळी, तिळगुळाचे लाडू यांची चंगळ! तीळ आणि काळा रंग हे शुभ नसूनही संक्रांतीच्या दिवशी मात्र तिळाचेच पदार्थ खाल्ले आणि काळेच वेश घातले जातात.
संक्रांत म्हणजेच आकाश भरून निरनिराळे, लहान-मोठे, रंगीबेरंगी पतंग आणि चक्र्यांवरती फिरते लाल-पिवळे मांजे.
डेलावेअर व्हॅली मराठी मित्र मंडळ आपल्या सर्वांना सहकुटुंब ह्या समारंभासाठी सादर आमंत्रित करीत आहे. कृपया स्थळ, तारीख आणि वेळ यांची नोंद करून घ्यावी:
|